नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल
नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल ग्रॅच्युइटीचा नियम बदलला : ग्रॅच्युइटी साठी ५ वर्षाची सेवा अनिवार्य नाही. फक्त १ वर्षाची सेवा पुर्ण केली तरी ग्रॅच्युइटी साठी पात्र. काही Contract Employees देखील नवीन नियमांनुसार पात्र ठरतील. कंपनीत कमी कालावधीची नोकरी असली तरी आता ग्रॅच्यइटी मिळू शकणार. कामाचे तास आणि ओव्हरटाईम : किमान वेतनासोबत ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन अनिवार्य. ओव्हरटाईमसाठीज जबरदस्ती नाही. राज्य सरकारे ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ठरवू शकतात. कामाच्या दिवसांची पात्रता मर्यादा २४० दिवसांवरून १८० दिवसांवर कमी. नोकरीवर ठेवताना नियूक्ती पत्र अनिवार्य : प्रत्येक कर्मचाऱ्याला नियुक्ती पत्र देणे कपन्यांसाठी बंधनकारक. पत्रात पगार, कामाचे तास, आणि कामाची माहिती स्पष्ट नमूद असावी. नियुक्ती पत्रामळे कर्मचारी-नियोक्ता संबंध अधिक पारदर्शक होतात. किमान वेतनाची देशव्यापी अंमलबजावणी : केंद्र सरकार आता संपूर्ण देशासाठी किमान वेतन दर निश्चित करेल. कोणतेही राज्य सरकार या दरापेक्षा कमी वेतन ठरवू शकत नाही. यामळे सर्व क्षेत्रांतील क...