Akshaya Tritiya 2023: साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय्य तृतीया, अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोनं महागलं , सोनं ६३ हजार रुपयांच्या पार जाणुन घ्या संपुर्ण माहिती........

 


साडे तीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया या मुहूर्ताला विशेष महत्व आहे. हिंदू बांधवांचा पवित्र सण म्हणून अक्षय्य तृतीयाला ओळखलं जातया दिवशी सोन्याची खरेदी, शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते.मात्र, पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी तसेच या दिवशी सोनं कोणत्या मुहूर्तावर खरेदी करावे याबाबत सविस्तर माहिती आपण जाणुन घेऊ.

 

हे वाचा.............
Link Voter ID with Aadhaar: तुम्ही केले काय मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक? घर बसल्या देखील करू शकता हे काम.


अक्षय्य तृतीयाचे नेमकं महत्व काय आहे

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयाचे खास महत्व आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त पवित्र मानला जातो. 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया आहे. याच दिवशी भगवान परशुराम जयंती आणि भगवान बसवेश्वर जयंती आहेअक्षय्य शब्दाचा अर्थ असा आहे की कधी ही नाश होत नाही. या दिवशी केलेले ज्ञान, दान, जप अक्षय्य फल प्राप्ती देणारे असते. म्हणून याला अक्षय्य तृतीया असं म्हणतात.

यावेळी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी शनिवारी येईल. याच दिवशी परशूराम जयंती आणि रमजान ईद देखील आहे. शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे शुभ कार्य केले जाते. त्याचे अनंत फळ मिळते. या दिवशी पंचांग पाहता शुभ कार्य करता येते. पुराणानुसार या दिवशी पितरांसाठी केलेले तर्पण आणि दान पुण्य देते. हा सण सोमवारी किंवा रोहिणी नक्षत्राच्या दिवशी आला तर त्याचे फळ वाढते.


हिंदु परंपरेप्रमाणे या दिवशी करावयाच्या गोष्टी

·      अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.

·   फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.

·   ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.

·   या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.

·   वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.

·   या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.

·   पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन ब्राम्हणास दान द्यावी.

·   पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ ब्राम्हणास खावयास द्यावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 





अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त शनिवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत राहील. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

 

अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी करताय? लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा...




1 एप्रिल 2023 पासून सर्व दुकानदारांना दागिन्यांवर 6 डिजिट हॉलमार्किंग असणे आवश्यक झालेय. सोन्याला हॉलमार्क नसेल तर अशा ठिकाणाहून सोने खरेदी करू नका.

भारतात अनेकदा लोक सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहतात. अशा स्थितीत सोनं खरेदी करताना त्याची एक्सचेंज व्हॅल्यू किती आहे हे तपासले पाहिजे यासोबतच सोनं खरेदी करताना हे लक्षात ठेवा की, तुम्हाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर पॅन डिटेल्स द्यावे लागतील. आर्थिक व्यवहारात स्वच्छता आणि पारदर्शकता यावी यासाठी हा नियम करण्यात आला आहेABP माझा

 

हे वाचा.............
भन्नाट आश्या १९ कल्पना जे तुमचे वाचवु शकते कर / 19 DIRECTIONS to Save Income Tax on Salary




Comments

Popular posts from this blog

नवीन लेबर कायद्यामध्ये १० मोठे बदल

आता तुमच्या जमिनींना पण मिळणार आधार नंबर काय आहे नक्की हा उपक्रम जाणुन घ्या !

Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक. नाहीतर ३० जुन नंतर... भरावा लागेल १०००० दंड....