तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार.

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे . तसेच , इंजिनियरिंग मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे . शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी घेतला आहे . राज्य सरकारही (Maharashtra Government) याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे . ABP माझा सहामाही (Semester) पॅटर्नवर भर नव्या शिक्षण धोरणानुसार , बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे . सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते . परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे . म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आलं आहे . तसंच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे ...